रघुजी भोसल्यांच्या शिक्क्याची गोष्ट

#ऐतिहासिक_सत्यकथा #भाग_२ नागपूरकर भोसल्यांचा इतिहासही दैदिप्यमान आहे. त्यांच्या इतिहासात जे पुरुष नावारूपाला आले , त्यापैकी एक म्हणजे पहिले रघुजी भोसले होय. सेनासाहेबसुभा परसोजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र कान्होजी भोसले यांस सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे मिळाली. त्यानंतर वऱ्हाडात भाम याठिकाणी त्यांनी आपले स्थान बळकट केले. सुरुवातीस कान्होजी यांस संतति नसल्याने त्यांनी आपल्या चुलत बंधूंचे सुपुत्र रघोजी(पहिले) उर्फ बाबासाहेब यांस आपल्याजवळ ठेविले होते. पुढे कान्होजीस रायाजी नामक पुत्र झाल्यावर त्यांचे रघुजीवरील प्रेम कमी होत गेले. त्यांच्यात बेबनाव होऊन रघुजी चांदसुलतान गोंड राजे यांच्याकडे चाकरीला राहिले होते. नंतर फत्तेसिंग भोसले, रघुनाथभट पटवर्धन इ. मंडळींनी साताऱ्यात शाहू राजांकडे रघुजींसाठी शब्द टाकला होता. पुढे ते फत्तेसिंग भोसले यांच्याबरोबर कर्नाटक स्वारीवर गेले होते.त्यांनी कर्नाटक प्रांती जाऊन स्वपराक्रम व जवमर्दी करून प्रांत सर केला. पुढे कान्होजी भोसले यांनी वऱ्हाड प्रांती बदफैलीवर जुलूम करून महाराजाशी बागी(बंडखोर) झाले. सबब त्यांचे पारिपत्या...