Posts

Showing posts from March, 2019

पोर्तुगीजांनी(Inquisition) केलेला हिंदूंचा छळ व अन्याय

Image
सदर लेखात आपण पोर्तुगीजांनी(इंक्विझीशनने) हिंदूंचा छळ कशाप्रकारे केला ह्याबद्दल थोडी माहिती देत आहे. ह्यात इंक्विझीशन हा शब्द वारंवार आला आहे. The Inquisition may be described as an ecclesiastical tribunal for the suppression of heresy and punishment of heretics. पोर्तुगीजांनी हिंदूंचा वसई व गोवा येथे मोठ्याप्रमाणावर छळ केल्याची अनेक वर्णने आहेत. पोर्तुगीजांच्या अमलाखालील गोव्याच्या जुन्या काबेजादीतील तिसवाडी , साष्ट व बारदेश ह्या प्रदेशांप्रमाणे वसई प्रांताचेहि ख्रिस्तीकरण एकाच तत्वावर झाले. ते तत्व म्हणजे “ Cuius regio, illius religio” (ज्याचे राज्य, त्याचा धर्म) हे होय. पोर्तुगीज अमलातील लोकांसाठी ख्रिस्ती धर्म प्रसारार्थ वेळोवेळी कायदे करण्यात आले होते. वास्तविकरीत्या अशा तऱ्हेचे कित्येक कायदे पोर्तुगाल येथे ज्यू व मुसलमान लोकांसाठी फार वर्षापासून प्रचलित होते. गोव्यापेक्षाही वसई प्रांतामध्ये हिंदु लोकांस विशेष तीव्रतेने धर्मछळ सोसावा लागला असावा. त्या प्रांतातील वतनदारांस आपापल्या गावातील हिंदु जनतेमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी केलेल्या प्रयत्नाचा अहवाल सरका...