औरंगजेब:- तंबूंचे तणावे कापू

#ऐतिहासिक_माहिती मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमराच्या काळात राजाराम महाराजांनी अनेक हाल अपेष्टांचा सामना करत जिंजीचा किल्ला गाठला. त्यानंतर मुघलांच्या वतीने झुल्फिकारखानाने जिंजीच्या किल्ल्यास वेढा टाकला. या वेढ्याच्या वेळी, मराठे व झुल्फिकारखान यांचे सूत जुळले होते असे दिसते. मराठ्यांची होणारी ये-जा, पोहोचणारी रसद यात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत नव्हते. औरंगजेबासही याचा सुगावा लागलाच होता. नोव्हेंबर १६९२- जिंजीच्या छावणीतून आलेली बातमी, मोगलांचे हल्ले जिंजीवर चालू आहेत, पण किल्ला त्यांचे हाती पडण्याचे लक्षण दिसत नाही. दक्षिणेतून जिंजीच्या बचावास भराभर फौजा येत असल्याची बातमी आहे. मोगलांच्या लष्करावर आतील(किल्ल्यातील) मराठे छापे घालतात, ते यशस्वी होतात. राजाराम व झुल्फिकारखान यांचे अंतस्थ सूत आहे, असा बाहेर जो बोभाटा चालतो त्यास पोषक अशाच गोष्टी दिसून येतात. झुल्फिकारखानाचे वकील खुशाल राजारामाकडे जात-येत असतात. उभयतांच्या वाटाघाटी चालतात. या वाटाघाटी काही गुप्त काही राजरोस घडत आहेत. बादशहाकडून झुल्फिकारखानास वारंवार ताकिदी व ठपके येत आहेत. तुम्ही ताबडतोब जिंजीचा किल्ला ...