नानांचे नाव

नाना नावासंबंधी ही माहिती आहे. गोपिकाबाई नाना फडणविसांस 'फडणीसपंत' असे म्हणत असे. 'नाना' हे नाव नानासाहेब पेशव्यांचे असल्यामुळे त्याचा उच्चार गोपिकाबाई करीत नसत. ह्यासंबंधी हरिपंत फडके यांचे एक पत्र आहे. "विद्यापना. मातुश्रींचे(गोपिकाबाईंची) दर्शन झाल्यावर फडणीसपंत काय करितात अशी गोष्ट प्रथम निघाली. तेव्हा मनात आले की, नाना का म्हणत नाही? फडणीसपंत का म्हणतात? तेव्हा तेथील माहितगारीने मनास आणितां, नाना म्हणत नाही, व मजला एक वेळ स्वामींनीही गोष्ट सांगितली होती की, फडणीसपंत म्हणत असतात. 'नाना' म्हणजे नानासाहेबांचे नाव ते घेत नाही, असे सांगितले. त्यावरून संशय गेला. नाहीतर फडणीसपंत कुन्ह्याने म्हणतात असे वाटत होते. मौजेची गोष्ट मनात आली ती लिहिली असे. र|| छ. २९ माहे साबान हे विद्यापना" #ऐतिहासिक_माहिती संदर्भ:- इतिहाससंग्रह - तुषार माने