गोव्यातील एक समारंभ

वसई प्रांत हातातून गेल्यावर तर पोर्तुगीजांची आर्थिक घडी फारच बिघडली होती. परंतु ‘सुंभ जळाला पीळ न गेला’ ह्या न्यायाने त्या काळीसुद्धा पोर्तुगेजांचा हिंदुस्थानातील बडेजाव कमी झाला नव्हता ! मार्केज द ताव्ह्र्र ह्या विजरईच्या कारकीर्दीस सन १७५१ मध्ये सुरुवात झाली तेव्हा गोव्याचे उत्पन्न तेथील खर्चास देखील पुरेल इतके नव्हते. परंतु नवलाची गोष्ट म्हणजे गोव्यात त्या काळी देखील मोठमोठे सरकारी समारंभ होत असत. म्हणजे पोर्तुगेजांची अवस्था “घरात नाही दाणा अन मला(आम्हाला) बाजीराव म्हणा” अशी होती(त्यात पुनः बाजीरावांचं नाव घेतलं म्हणजे पोर्तुगीजांचं पित्त खवळायचं नाही का!) अशा समारंभांपैकी एक मोठा उत्सव पोर्तुगालचा राजा पहिला दों जुझे ( D . Joze I) हा गादीवर बसल्यावर गोवे शहरामध्ये सन १७५१ तील डिसेंबरात झाला. त्याचे समकालीन वर्णन उपलब्ध आहे. हा समारंभ एक आठवडा चालला होता ! त्या दिवसांत करण्यात आलेली गोवे शहरातील मांडवी नदीच्या तीरावरील अपूर्व रोषणाई पाहण्यासाठी खासा विजरई बोटींतून रात्री फिरत होता. हिंदू लोकांनीही ह्या उत्सवामध्ये पुष्कळ पैसा खर्च करून हिरीरीने भाग घेतला होता ! ह्या प्र...