शिवरायांची आग्ऱ्यातील सुटकेनंतरची एक गोष्ट

शिवाजी महाराजांविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या किंवा मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या. शिवाजी महाराजांचे शरीर हवामय आहे, त्यांना पंख असल्याने ते उडू शकतात व एकाच दिवशी एकापेक्षा जास्त ठिकाणी दिसून येतात. ह्या अशा अफवांचा पुरेपूर फायदा शिवाजी महाराजांनी करून घेतला. महाराज आग्ऱ्यातून निसटल्या नंतर तर अफवांचे पीक आले. 'महाराज राजपुतान्याच्या दिशेने गेले किंवा शिवाजी राजे आग्ऱ्यात लपून बसलेत व ते बादशहावर हल्ला करणार' अशा कैक गोष्टी पसरल्या. असेच आग्ऱ्यातून निघाल्यानंतर शिवाजी महाराज बनारसला गेले त्याचा एक प्रसंग खाफीखानाने नोंदवला आहे. तो प्रसंग House Of Shivaji या ग्रंथात जदुनाथ सरकारांनी दिला आहे. तो पुढील चित्रांमध्ये देत आहे. #shivaji #shivajimaharaj - तुषार माने