अखेर मातुःश्रींची भेट झाली !

३ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वरास संभाजी राजांना कैद करण्यात आले.त्यानंतर राजारामाला मराठ्यांचा राजा म्हणून जाहीर करण्यात आले. येसूबाईनी या गोष्टीस संमती दिली. येसूबाईंना राजारामाविषयी आस्था होती, तसेच राजारामास शाहूबद्दल प्रेम होते. संभाजीराजे पकडले जाण्यापूर्वी रायगडाभोवती मोगली सैन्य जमा झाले होते. औरंगजेबाने एतिकादखान(झुल्फिकारखान) याला रायगडाच्या वेढ्याच्या कामास पाठविले होते. २५ मार्च १६८९ रोजी त्याने रायगडास वेढा घातला. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांचे समर्पण झाले. पतीनिधनाचे दुखः कोसळले असताना येसूबाईंनी जी धीरोदात्तता दाखविली, त्यास मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. मुघलांचा वेढा कडक होत असताना सर्व परिवार हाती लागू नये म्हणून,येसूबाईंनी सल्ला दिला. 'मुलाचे(शाहू) वय लहान,राज्य तरी गेलेचं,त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार शूर याणी एक विचारे होऊन, राजारामसाहेब यास घेऊन बाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बांकी ऐशी दुसरी नाहीच. अर्थी मुलास व आम्हांस येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे. तुम्ही सर्वांनी राजारामसाहेबांसहवर्तमान बाहेर पडून, फौजा ज...