**अकबर व इतर धर्म**

इस्लामच्या पायाभूत तत्वांबाबत त्यांच्या धर्म पंडितांमध्ये असलेले मतभेद व त्यांच्या आपसातील असलेल्या भांडणांमुळे अकबर वैतागला आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्याने इतर धर्मांच्या विद्वानांना इ.स.१५७८ च्या शेवटला इबादतखान्यात चर्चेला पाचारण केले.अबुल फझल म्हणतो,"The Imperial Court became the home of piligrims of the seven worlds and the scholars of various religious sects." १) अकबर व झोरोस्ट्रीयन्स:- झोरोस्ट्रीयन उर्फ पारशी धर्माचा विद्वान धर्मगुरू नवसारीचा दस्तूर मेहरजी राणा याच्याशी अकबराची इ.स.१५७३ मध्ये प्रथम भेट झाली होती. इ.स.१५७८ अकबराने दस्तूर राणाला इबादतखान्यात पाचारण केले.त्याच्या संपर्कामुळे अकबरावर पारशी धर्माचा बराच प्रभाव पडला व अकबराने पारशी धर्माच्या काही तत्वांचा स्वीकारही केला.त्याने दस्तूर राणाला २०० बिघे जमीन इनाम म्हणून दिली.पारशी धर्माच्या प्रभावामुळे अकबराने त्याच्या महालात अखंड अग्निप्रज्वलन प्रथा सुरु केली,अशा रीतीने अकबराने सूर्य,अग्नि,प्रकाश या देवतांविषयी पूज्यभाव बाळगला. २) अकबर आणि जैनधर्म:- अकबराचा जैन धर्माशी संपर्क इ.स.१५५८ मध्येच आला.इ...