**प्रेमाचा मामला औरंगजेब गुंगला**



आलमगीर औरंगजेब म्हणजे क्रुरता,कपट,धर्मांधता,अत्याचार,आबिद(परमेश्वराचा भक्त) ह्या सगळ्यांचा पुतळाच होय.औरंगजेब हा त्याची आई मुमताजमहल हिचे सहावे अपत्य होय.त्याचा जन्म २४ ऑक्टोबर १६१८ रोजी झाला.तो लहानपणापासून अत्यंत साहसी,बुद्धिमान,महत्वकांक्षी असल्याने १६३४ मध्येच दहा हजाराचा मनसबदार झाला.दक्खनच्या सुभ्याचा सुभेदार म्हणून त्याने दोन वेळा काम पाहिले.शाहजहान बादशहाने त्याला जेव्हा इ.स.१६५२ मध्ये दक्खनच्या सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमले  तेव्हापासूनच औरंगजेबाने दिल्लीचे शाहीतख्त कसे मिळवता येईल यासाठी आपली बहीण रोशनआराच्या मदतीने प्रयत्न सुरु केले.इ.स. १६५२ मध्ये औरंगजेब दिल्लीहून औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाला तेव्हा वाटेत त्याने बुऱ्हाणपूरला मुक्काम केला.हा मुक्काम बहुधा त्याच्या आयुष्यातला यादगार मुक्काम असावा.

येथेच औरंगजेबाच्या आयुष्याची दुसरी बाजू समोर येते.त्याने त्याच्या आयुष्यात घालवलेले गुलाबी दिवस असे त्यास म्हणता येईल.गुलाबी दिवस म्हणजे धर्मनिष्ठ औरंगजेबाचे प्रेमप्रकरण! ह्या प्रेमप्रकरणा आधी औरंगजेबाची तीन लग्ने झालेली होती.पण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असत......!
कर्तव्यकठोर,स्वाभिमानी तसेच मुरतसम जमीरे आकसद (जिहाद व पुण्य संपादन) ही महत्वकांक्षा बाळगणारा औरंगजेब देखील प्रेमाच्या सागरात अखेर बुडालाच!
औरंगजेबाची चार लग्ने झाली होती, पण ह्या प्रेमप्रकरणा आधी तीन झाली होती.त्या तीन बायकांपासून त्याला ८ अपत्ये होती.त्याच्या तीनही बायका राजघराण्यातील होत्या.तरी तो प्रेम प्रकरणात अडकला.ते म्हणतात ना,दिल आया गधी पे तो परी क्या चीज है | तरी शेवटी प्रेम आंधळ असत म्हणा. 

औरंगजेब बुऱ्हाणपूर येथे मुक्कामाला होता, तेव्हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार मीर खलील हा औरंगजेबाच्या मावशीचा नवरा होता.मीर खलीलच्या जनानखान्यात एक हिराबाई नावाची दासी होती.ती गायनात व लावण्यात केवळ अद्वितीय होती.तिच्या पहिल्याच दर्शनात औरंगजेबाचे तिच्यावर प्रेम जडले.तिच्याबद्दल उल्लेख येतात ते पुढीलप्रमाणे:- 
  • At Burhanpur he wooed and won the graceful singer Hira Bai surnamed Zainabadi Mahal, and here he lingered for the next nine months inspite of Shah Jahan's repeated orders urging him to go to Aurangabad , the official capital of Mughal Deccan.
  • औरंगजेबाच्या अंतःपुरात एक नर्तकी होती.तिच्यावर त्याचे अतिशय प्रेम होते.त्या प्रेमापायी त्याने काही दिवस प्रार्थना व व्रते या धार्मिक कामाकडे दुर्लक्ष केले.तो आपला काळ संगीत व नृत्य यांचा आस्वाद घेण्यात घालवू लागला.इतकेच नव्हे तर त्या नर्तकीच्या सांगण्यावरून तो मदिरापानही करू लागला.
  • During his viceroyalty of the Deccan, the prince paid a visit to his aunt at Burhanpur.There,while strolling in the park of Zainabad on the other side of the Tapti, he beheld Hira Bai unveiled among his aunt's train.The artful beauty ''on seeing a mango-tree laden with fruits, advanced in the mirth and amorous play , jumped up, and plucked a mango as if unconscious of the prince's presence." The vision of her matches charms stromed Aurangzib's heart in a moment; "with shameless importunity he took her away from his aunt's house and became utterly  infatuated with her."  
औरंगजेब हिराबाईच्या प्रेमात इतका गुंतून गेला होता की खुद्द शहाजहान बादशहाने पाठविलेल्या हुकूमांकडे दुर्लक्ष करून तो पुढे नऊ महिने बुऱ्हाणपूरलाच हिराबाईच्या सहवासात रेंगाळत राहिला.एक उल्लेख असा आहे की, हिराबाईने औरंगजेबाच्या हातात दारूचा प्याला दिला होता.तो दारूचा प्याला ओठांना लावणार इतक्यात हिराबाई त्याला म्हणाली,'''मी केवळ आपल्या प्रेमाची परीक्षा पाहिली.आपल्या हातून दारू पिण्याचे पाप घडवून आणण्याची माझी इच्छा नव्हती.''औरंगजेब स्वतःची सदसदविवेकबुद्धी हरवून बसला होता.कुरणाला इष्ट
मानणाऱ्या अल्लाच्या बंद्याने प्रेमसागरात डूबल्यावर अल्लाला मान्य नसणाऱ्या गोष्टी केल्याच.

हिराबाईचा सहवास औरंगजेबाला फार काळ लाभला नाही.ती लवकरच मरण पावली.औरंगजेबाने तिच्या पार्थिव देहाला औरंगाबादजवळ एका तलावाशेजारी मूठमाती दिली.तिच्या मृत्यूने तो कमालीचा दुःखी झाला होता.इतका की, जेव्हा तो शिकारीस जाण्यासाठी निघाला तेव्हा म्हणाला,"घरी बसून अश्रू ढाळल्याने माझ्या मनाचे समाधान होणार नाही तर मनसोक्त रडून घेण्यासाठी मला जंगलातच गेले पाहिजे."
हिराबाई हे औरंगजेबाचे प्रेम होते त्याला दुसऱ्या कशाचीही सर आली नाही.त्याचे नंतर उदेपुरी बेगम वर पण खूप प्रेम होते पण हिराबाई प्रकरणा सारखे त्याने आपले भान ह्यावेळी गमावले नव्हते.

कुराणातील आयतांवर जसे औरंगजेबाचे प्रेम होते,तसेच हिराबाई ही त्यास कुराणातील एक आयतच असावी असे वाटते.बुऱ्हाणपूरात बाग-ए-झैनाबाद  नावाची बाग देखील होती.हिराबाईच्या विरहानंतर त्याच्या आयुष्यातून रंग,रस निघून जाऊन फक्त धर्मजीवन राहिले.औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान लिहितो,"न चश्म सूये गजाल , ब न गोश सूये गजल" म्हणजे इथं कामिनीही नव्हती आणि कविताही नव्हती.औरंगजेबासारखा कट्टर धर्मवेडा,गय्यूर(स्वाभिमानी) व्यक्ती देखील प्रेमात वेडा झाला हे निश्चितच!

संदर्भ:-History Of Aurangzeb
           Short History Of Aurangzeb
           असे होते मोगल
           औरंगजेब
           हसरी मोगलाई

Ⓒतुषार माने

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**

**श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे**