Posts

Showing posts from May, 2017

**हिंदुस्थान अमर आहे नि अमर राहील**

Image
स्वदेशावरील वा मानवजातीवरील प्रेम अंतःप्रेरित असेल तर ते उदात्त ठरते नि चिरकाल टिकते. परंतु केवळ बाह्य प्रेरणेतून निर्माण झालेली देशभक्ती नि मानवसेवेची वृत्ती लवकरच कोमेजते आणि लोप पावते.अंतःप्रेरित भक्ती मानवजातीच्या प्रगतीवरील किंवा मानवी जीवनाच्या पावित्र्यावरील श्रद्धेतून उदय पावलेली असते.पण जे कोणत्याही विशिष्ट देशाचे नसून साऱ्या जगाचेच झालेले असतात, अशा निः स्वार्थी देशभक्तांच्या उज्वल मालिकेत सावरकरांची गणना होते. १९४१ सालात मद्रासला भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात जिनांनी हिंदुमहासभेवर कडाडून हल्ला चढविला. हिंदुमहासभेत कसलीही सुधारणा होण्याची काडीमात्र अशा उरलेली नाही असे त्यांनी मत व्यक्त केले.आणि ब्रिटिश सरकारला अशी धमकी दिली की,"तुम्ही जर पाकिस्तानी राज्यांचा गट निर्माण करण्याची आमची मागणी पुरवली नाहीत, तर दुसरे लोक पुढे होऊन आमची इच्छा पुरी करतील." जिनांनी हिंदुमहासभेविषयी काढलेल्या उद्गारांचे स्वागत करून सावरकर म्हणाले की,"आमच्या निष्कलंक  देशभक्तीचाच हा निर्भेळ गौरव आहे." काँग्रेसला इशारा देऊन सावरकर पुढे म्हणाले,"काँग्रेस पक्षानेही  पाक...