**बॉर्न फायटर लोकमान्य टिळक**

आधुनिक भारताचे जनक दोन दशकांहून अधिक काळ राजकीय क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनावर लोकमान्य टिळकांनी अधिराज्य गाजवले.Among the political leaders who dominated the thoughts and activities of their countrymen during this period the foremost place must be given to Mr.Tilak. ज्या काळात भारतीय सुशिक्षित लोक ब्रिटिशांच्या राजवटीचे गोडवे गात होते, जनता सुस्त आणि आपल्या अधोगतीबद्दल उदासीन बनली होती, आणि भारताला अंधकाराने घेरले होते, तेव्हा क्षितिजावर टिळकांचा उदय झाला आणि आत्मसन्मानाचे स्फुलिंग लोकांच्या मनात चेतवून स्वतःच्या अधिकारांसाठी उभे राहण्याचे धैर्य टिळकांनी त्यांना दिले. भारतातील ब्रिटिशांची सत्ता हे ईश्वरी वरदान आहे तसेच ब्रिटिशांची न्यायबुद्धी भारताची राजकीय प्रगती घडवून आणील असे काही विद्वान लोकांना वाटत असल्याने ते कधीही जनतेकडे गेले नाहीत.आपल्या शक्तीचा खरा उगम लोकांच्या ठायी आहे हे वास्तव त्यांनी कधीच ध्यानात घेतले नाही.लोक घाम गाळत राहिले आणि कुठलीही आशा न धरता सोसत राहिले.तेव्हा परक...