Posts

Showing posts from December, 2018

शाहू महाराज स्वदेशी दाखल व बापुजी सोनाजी दिघे यांची कामगिरी

Image
#जुन्या_ऐतिहासिक_गोष्टी राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत यांस हुकूमतपन्हा हे पद दिले होते. त्यावेळी महाराजांच्या आज्ञेवरून मावळ प्रांतीचे सरदार, देशमुख, देशपांडे, जमीनदार आपले जमावानिसी रामचंद्रपंत हुकूमतपन्हा यांचे लष्करात सामील होऊन मोठमोठे पराक्रम करीत होते. रामचंद्रपंतांच्या लष्करात शंकराजी नारायण गांडेकर हे फार हुशार कारकून होते. त्यांनी मावळातील सरदार व फौजेनिशी मुघलांनी जिंकलेले किल्ले, मुलुख काबीज केले. हे वर्तमान रामचंद्रपंतांनी जिंजीस लिहून पाठविल्यावर, राजाराम  महाराजांनी शंकराजी नारायण यांना सचिवपदाचा अधिकार देऊन वस्त्रे पाठविली. शंकराजी नारायण सचिव यांचे फौजेत मुठेखोरे महालचे दिघे देशपांडे मंडळीतील चौघे सरदार होते. याविषयी इसवी सन १६९८ सालचे एक पत्र आहे.१ (इतिहाससंग्रह)                                श्री      “म|| अनाम देशकुलकर्णी तर्फ मुठेखोरे यांसी:- शंकराजी नारायण सचिव सुरुसन तिस्सा तिसैन अलफ, बद्दल शेरणी हक्कापैकी बद्दल देणे वेतनात कारकून व लोक ...