** कुणबिणी किंवा बटिकी**

#भाग_१ जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत ‘गुलामगिरी अथवा दास्यत्वाची’ पद्धती आढळते. मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणावर चालू राहिली. युरोप-आफ्रिका खंडातही अशा लोकांना विकलेली अनेक उदाहरणे सापडतात. तशा जाहिराती सुद्धा आढळतात. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात देखील ही गोष्ट राजरोसपणे चालत होती. महाराष्ट्रात सुद्धा पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती. ‘कुणबी ’ हा शब्द व्यवसायवाचक आहे. हा शब्द जातीवाचक सुद्धा आहे. मराठी कागदपत्रात कुणबीण हा शब्द ‘स्त्री-गुलाम ’ या अर्थाने येतो. तत्कालीन लोक दासींना कुणबिणी किंवा बटिकी म्हणत. श्रीमंत , सरदार , राजेरजवाडे व सुखवस्तू लोक आपल्या पदरी कुणबिणी व बटकी बाळगीत. पुरुष गुलामांना ‘पोरगे’ म्हणत व त्यांचा जन्म स्त्री गुलाम म्हणजे कुणबिणींच्या पोटीच झालेला असे. असे पोरगे आपल्या आईबरोबरच विकले जात. कुणबिणी व बटिकी विकणे हा हेडे , चारण इ. लोकांचा धंदा होता. कुणबिणी/बटिकी संबंधी येणारी माहिती:- “लढाईत कोणी पुरुषास धरीत नाहीत व गावगाना लुटीचे समईही कोणी पुरुषास धरीत नाहीत. गावगाना लुटीचे समई बायकास अगर मुलीस ...