Posts

Showing posts from January, 2020

सेनासाहेबसुभ्यासाठी भोसले बंधुंची भांडणे व देवाजीपंत चोरघडे यांची हुशारी

Image
#ऐतिहासिक_माहिती नागपूरकर सेनासाहेबसुभा रघूजी भोसले(थोरले) मरण पावले तेव्हा त्यांस चार पुत्र होते. जानोजी , मुधोजी, बिंबाजी व साबाजी. त्यातील जानोजी व बिंबाजी हे चांगले कर्ते होते. जानोजी व साबाजी हे धाकटे स्त्रीचे असून जानोजी हे चौघात वडील होते. मुधोजी व बिंबाजी हे वडील स्त्रीचे होते. रघूजींनी मरणापूर्वी , वडील पुत्र जानोजी यांनी सेनासाहेबसुभ्याचा मुख्य अधिकार चालवावा व बाकीच्या तिन्ही पुत्रांनाही राज्यात वाटणी देऊन त्याचा परामर्ष घ्यावा असे सांगितले होते.  रघूजींच्या मृत्यूवेळी जानोजी व साबाजी त्यांच्याजवळ होते. त्याचवेळेस मुधोजी यांस गाविलगडचा किल्ला सर करण्यास पाठविले होते. मुधोजी हे वडील बायकोचे सुपुत्र या नात्याने त्यांनी आपला वडीलपणा पुढे करून सेनासाहेबसुभ्याचे पद मिळविण्याचा विचार केला. जानोजी भोसल्यांनी देखील मुधोजींचे मन ओळखून आपली मजबुती करण्यास सुरुवात केली. मुधोजींनी मार्गातूनच जानोजीस पत्र लिहिले , ‘आम्ही वडील मातोश्रीचे. तेव्हा कनिष्ठ तुम्ही. दौलतीची मालकी आम्हांकडेस. तुम्ही आमचे आज्ञेत वागावे.’ याप्रमाणे लिहून मुधोजींनी वऱ्हाडातून खंडण्या घ...