शिवाजी महाराजांचे आरमार
(सदर Article मध्ये आरमार कसे होते? त्याची गरज का होती? आणि महाराजांचे आरमाराबद्दलचे धोरण याबद्दल लिहिले आहे.मराठी आरमारी लढाया यांवर लिहिलेले नाही त्यावर एक वेगळे Article होऊ शकेल.) शिवाजी महाराज १२-१३ वर्षांचे असताना म्हणजे १६४२-४३ मध्ये त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर करण्यात आली.पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला.आदिलशाहीच्या जहागिरीत राहून येथील किल्ले जिंकून सत्तेची पाळेमुळे रोवली.राजगड,रोहिडा,तोरणा,कुवारगड,कोंढाणा इत्यादी किल्ले ताब्यात आणले. इ.१६५५-५६ मध्ये जावळी सर केल्यावर रायगड किल्ला स्वराज्यात आला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन भिडली,तेव्हा स्वराज्याचा संबंध सिद्दी,इंग्रज,पोर्तुगीज,डच,फेंच या सत्तांशी आला.(आजचा मुंबईतील कुलाबा हा प्रदेश सिद्दीच्या अमलाखाली होता.)सिद्द्यांची राजधानी दंडराजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर होती.किनारपट्टीवर धाडी घालणे,लुट करणे,जाळपोळ करणे,बायका पळवणे,लोक बाटवणे हा सिद्द्यांचा जुना धंदा होता.या सगळ्याची दखल शिवाजी महाराजांनी घेतली होती. पुढे १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण,भिवंडी पावेतो प्रदेश...
Comments