**श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे**

एक कुशल प्रशासक आणि धडाडीचा सेनापती असणारी पेशव्यांच्या घरातील आसामी म्हणजे श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे! हिंदुस्थानचा कारभार हिंदुस्थानी लोकांच्या हातात असाच आग्रह धरणारा सदाशिवरावभाऊ हा इथल्या सांस्कृतिक आणि राजकीय एकात्मतेच महत्व ओळखणारा पहिला माणूस असला पाहिजे. सदाशिवरावभाऊ यांचा जन्म भाद्रपद शुद्ध द्वितीय,श्री शालिवाहन शके १६५२,साधारण नाम संवत्सरी,सोमवारी म्हणजेच ४ ऑगस्ट १७३० रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते. त्यांचे वडील चिमाजीआप्पा हे उत्कृष्ट सेनानी होते. सदाशिवरावभाऊंच्या जन्मामुळे बाजीरावांना खूप आनंद झाला(चिमाजीआप्पांचा पहिलाच पुत्र)पुण्यात साखऱ्या वाटण्यात आल्या. बाळाचे बारसे १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. बाळाची आजी म्हणजे राधाबाई यांनी त्याचे नाव "सदाशिव" ठेवले. हेच पुढे सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब या नावांनी ओळखले जाऊ लागले. भाऊंच्या जन्मानंतर त्यांच्या आई रखमाबाई यांची तब्येत ढासळत गेली. औषधे चालू होती पण कसलाच फरक पडला नाही. ३१ ऑगस्ट १७३०,सोमवारी रात्री त्या मृत्यू पावल्या. आपल्या आईचा केवळ एका महिन्याचा सहवास त्या बाळास लाभला. त्यांच्या आईच्या ...