**आलिया भोगासी(बिचारा फिलिप गिफोर्ड)**
![]() |
सदर चित्र हे कोणाशीही संबंधित नसून त्या काळातला इंग्रजी अधिकारी कसा असू शकतो हे दाखवण्यासाठी दिले आहे. |
शके १५८१ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमीस म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी राजांनी अफझलखानास यमसदनी पाठविले.त्यानंतर महाराजांनी आदिलशाहीशी युद्धाची आघाडी उघडली.ते स्वतः आपले मुख्य सैन्य बरोबर घेऊन सह्याद्रीच्या पूर्वेचा म्हणजे देशावरचा विजापुरी मुलुख काबीज करीत निघाले,त्याच समयी काही सैन्य कोकणात धुमाकूळ घालून आदिलशाही मुलुख जिंकून घेऊ लागले.मराठी सैन्य कोकणात घुसल्यावर आदिलशाही सैन्याची पुरती दाणादाण उडाली.विजापुरी अधिकारी आपापल्या जागा सोडून राजापूरकडे पळत सुटले.त्यावेळी राजापूर बंदर आदिलशाहीच्या ताब्यात होते व तिथे रुस्तुमजमा नावाचा अधिकारी तिथला कारभार पाहत असे.ह्या रुस्तुम-इ-जमानचा महाराजांनी कोल्हापूरजवळ २८ डिसेंबर १६५९ रोजी पराभव केला होता.राजापूर ही एक मोठी बाजारपेठ होती.आयात-निर्यातीचे केंद्र असल्यामुळे राजापूर श्रीमंत शहर होते. इ.स.१६५८ च्या उत्तरार्धात इंग्रजांनी तिथे एक वखार उघडलेली होती.
दोरोजी(धोरोजी) नावाच्या मराठी सरदाराने कोकणात जोरदार मुसंडी मारली होती.त्यावेळी फाजिलखानाच्या(अफझलखानाचा मुलगा) वतीने महमूद शरीफ दाभोळचा कारभार पाहत असे.या सुमारास अफझलखानाची तीन जहाजे व्यापारी मालाने खचाखच भरलेली होती,ती दाभोळच्या बंदरात उभी होती.मराठे दाभोळच्या रोखाने दौडत आहेत,ही खबर मिळाल्यावर महमूद शरीफ पळून राजापूरला गेला.सातवळीचा मुख्य अधिकारीही राजापूरला पळून गेला होता.फाजिलखान व रुस्तुम-इ-जमान यांनी अब्दुल करीम याला पत्र लिहून ती जहाजे राजापूरच्या दिशेने येत आहेत,त्यामुळे तुम्ही त्या जहाजांवरचा माल तुमच्या ताब्यात घ्यावा असे लिहिले होते.आपल्या मालकाचा म्हणजे रुस्तुम-इ-जमानचा मोठा पराभव झाला असल्याने अब्दुल करीम देखील चांगलाच हादरला होता.शेवटी तो १२ जानेवारी १६६० रोजी राजापूरहून जैतापूरला पळून गेला.अब्दुल करीम राजापूरहून जैतापूरला पळून गेला हे इंग्रजांना कळल्यावर ते सुद्धा त्याच्या मागे जैतापूरला गेले.कारण त्यांना अब्दुल करीमकडून काही पैसे येणे होते.अब्दुल करीमने तिथे दाभोळहून आलेल्या अफझलखानाच्या जहाजांवर आश्रय
घेतला होता.सुरतेच्या इंग्रजांचे डायमंड नावाचे व्यापारी जहाज जैतापूर इथे होते.राजापूरहून आलेले इंग्रज डायमंड जहाजावर चढले.इंग्रजांनी आपले जहाज दाभोळहून आलेल्या जहाजांना आडवे लावले आणि अब्दुल करीमला आपल्या जहाजावर येण्याचा हुकुम सोडला.महमूद शरीफ,अब्दुल करीम व सातवळीचा मुख्य अधिकारी असे तिघेजण डायमंड जहाजावर गेले.त्यानंतर इंग्रजांनी अब्दुल करीमकडे रकमेची मागणी केली.अब्दुल करीमने इंग्रजांना सुमारे १२०० पॅगोडे इतक्या किमतीचा माल दिला आणि बाकीची रक्कम युद्धाची धामधूम शांत झाल्यावर देण्याचे कबूल केले.

इंग्रजांचा व्यवहार संपतो न संपतो त्याच सुमारास मराठ्यांचे काही सैन्य राजापूर व काही जैतापूरला पोहोचले.अफझलखानाची जहाजे स्वतःच्या ताब्यात घेण्याचा मराठ्यांचा डाव होता.त्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत मागितली,पण त्यांनी साफ नकार दिला.विजापुरी अधिकाऱ्यांना आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी मराठ्यांनी इंग्रजांकडे केली,पण त्यालाही त्त्यांनी नकार दिला.इंग्रजांनी स्वतःचे राजकारण साधण्याचा प्रयत्न केला.विजापुरी अधिकाऱ्यांची परिस्थिती बघून त्यांनी त्या अधिकाऱ्यांना अटी घालायला सुरुवात केली.'तुमच्याकडून आम्हांला येणारी रक्कम जोपर्यंत चुकती होत नाही तोपर्यंत जहाज आमच्या ताब्यात राहील' असे त्यांनी त्या अधिकाऱ्यांना बजावले.विजापुरी अधिकाऱ्यांबरोबर करार झाल्यावर आम्हांला वेंगुर्ल्याला नेऊन पोहोचवा असे त्यांनी इंग्रजांना सांगितले.पण ह्या विजापुरी अधिकाऱ्यांना वेंगुर्ल्याला नेऊन सोडले तर फुकटचा शिवाजीचा रोष आपण ओढावून घेऊ असे त्यांना वाटले,म्हणून त्यांनी त्या मागणीला नकार दिला.दरम्यानच्या काळात त्या विजापुरी जहाजांवरील सैनिकांनी बंड पुकारले व आम्ही शिवाजीच्या बाजूचे आहोत असे जाहीर केले! विजापुरी अधिकाऱ्यांची मोठी पंचाईत झाली व त्यांनी जैतापूरच्या बंदरातून एक होडी भाड्याने घेतली.वेंगुर्ल्याला जाताना त्यांना हेन्री रेव्हिंगटनने डच वखारीच्या प्रमुखाला लिहिलेले एक शिफारसपत्र दिले.
इंग्रजांनी ताब्यात घेतलेल्या जहाजाला 'राजापोर मर्चंट' असे नाव दिले.ते जहाज तांदूळ,सुपारी वगैरे व्यापारी मालाने भरून इराणला पाठविण्याचा त्याचा बेत होता.परंतु पैसे नसल्यामुळे तो बेत बारगळला.विल्यम मिंघ्यामला राजापूर मर्चंटचा प्रमुख नेमून इंग्रज राजापूरला गेले.त्यानंतर रान्डोल्फ टेलर राजापूर येथील मराठी अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेला.'आदिलशाही अधिकाऱ्यांना आमच्या ताब्यात द्यावे व अफझलखानाची जहाजे आमच्या ताब्यात द्यावी' ही मराठ्यांची मागणी होती.पण त्याला टेलरने नकार दिला.मराठ्यांनी राजापोर मर्चंट हे जहाज आमच्या ताब्यात द्यावे ही मागणी केली व इंग्रजांनी त्यास संमती दर्शवली.पण अट घातली की,'मराठ्यांनी जेवढ्या रकमेपोटी तो माल ताब्यात घेतला होता,तेवढ्या रकमेची राजापूरवरील वरात(चेक) त्याने(मराठी अधिकाऱ्यांनी) द्यावी.' मराठ्यांकडून तशी वरात देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि इंग्रजांना माल मागवून घेण्यास सांगितले.पण इंग्रज पक्के व्यापारी होते,त्यांनी जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत माल मागवून घेण्यास नकार दिला आणि दंडराजपुरीचा किल्ला जिंकून घेण्याविषयी काही बोलणे करून इंग्रज माघारी फिरले.
त्यानंतर इंग्रज जैतापूरला आले.तिथल्या जहाजावरच्या सैनिकांनी बंड केले होते,त्यामुळे ते जहाज मराठ्यांच्या ताब्यात देण्याचे त्यांनी ठरविले होते.पण मधल्या काळात त्यांचा विचार बदलला व ते स्वरक्षणार्थ लढण्यास तयार झाले.त्यानंतर त्यांनी नांगर उचलला व जहाज हाकले.जहाज पुढे नेऊन मराठ्यांच्या तोफांच्या पल्ल्याबाहेर नेऊन नांगरले.इंग्रजांनी ते जहाज आमच्या तर्फे काबीज केले नाही,उलट त्याला जाऊ दिले म्हणून मराठे खवळले.त्यांनी जैतापूरातील वागजी नावाच्या स्थानिक व्यापाऱ्याला व इंग्रजाच्या वेलजी नावाच्या दलालाला कैद केले.त्यावर इंग्रजांनी मराठ्यांना धमकीवजा निरोप पाठविला की, जर आमच्या दलालाला आमच्या हवाली केले नाही,तर आम्ही गाव पेटवून देऊ.मराठ्यांनी वेलजीला एका टेकडीवर पाठवले व स्वतः ही टेकडी चढून वर आले.वेलजीला पाहून इंग्रजही टेकडीवर आले.वेलजीच्या सुटकेसाठी फिलिप गिफोर्ड व डायमंड जहाजाचा प्रमुख यांना मराठ्यांकडे पाठवून दिले.मराठ्यांनी इंग्रजांना चांगलेच चकविले.त्यांनी गिफोर्डवर झेप टाकून त्याला कैद केले आणि इंग्रजांनी आणखी पुढे येऊ नये हे सांगण्याकरिता डायमंडच्या प्रमुखाला माघारी पाठवून दिले.
गिफोर्ड व वेलजीला बरोबर घेऊन मराठे खारेपाटणकडे गेले व १५ जानेवारी १६६० च्या सुमारास मराठ्यांनी तिथला किल्ला आपल्या ताब्यात आणला.गिफोर्ड व वेलजीची रवानगी खारेपाटणच्या किल्ल्यातील कैदखान्यात करण्यात आली.गिफोर्ड तिथून इंग्रजांना पत्र लिहीत असे.जोपर्यंत जहाजे व त्यावरचा माल ताब्यात देत नाही तोपर्यंत आमची सुटका होणार नाही असे गिफोर्डच्या पत्रांमध्ये लिहिलेले आहे.हेन्री रेविंगटन याने गिफोर्डच्या सुटकेसाठी शिवाजी महाराज,रुस्तुमजमा, फाजीलखान यांना पत्रे लिहिली.१३ फेब्रुवारी १६६० रोजी रेविंगटनने महाराजांना लिहून कळविले,"दांडा राजपुरीच्या किल्ल्याबद्दल इंग्रजांनी तुमच्याशी किती मैत्रीने वागण्याचे वचन दिले आहे ते तुमच्या दोरोजी इत्यादी नोकरांनी तुम्हाला कळविले आहे असा आमचा विश्वास आहे.परंतु त्यांच्याकडून आम्हाला किती त्रास झाला हे तुम्हाला सांगण्याची आम्हाला शरम वाटते. आम्ही राजापूरच्या नदीत असलेली जहाजे कबीक करत नाही आणि आमच्या मित्रांचे शत्रू होत नाही म्हणून तुमच्या नोकरांनी आमच्या दलालाला व एका इंग्रजाला पकडून नेले आहे व पंचवीस दिवस कैदेत ठेवले आहे.जरी आमच्या दलालाला आता सोडून देण्यात आले आहे तरी अद्याप त्या इंग्रजाला खारेपाटणच्या किल्ल्यात कैदेत ठेवले आहे.त्यामुळे आम्हाला दुःख होत आहे आणि तुमच्या हुकमतीखालच्या बंदरांमधील सर्व व्यापारी त्यांचा आमच्याशी असलेल्या व्यापारात या कृत्यामुळे अडथळा येईल असे वाटून,भीतीग्रस्त झाले आहेत. तरी आम्ही सबुरी बाळगून आहोत आणि तुम्ही तुमच्या या सैन्याच्या प्रमुखाला पत्र पाठवून आमचे समाधान कराल अशी आशा बाळगून आहोत.म्हणून हे पत्र तुमच्या हाती पोचावे अशी आम्ही प्रार्थना करतो आणि आमचा इंग्रज व तुमच्या हुकमाविरुद्ध इतर जे काही घेतले असेल ते,आमच्या स्वाधीन करण्याविषयी तुमचे उत्तर यावे अशी विनंती करतो."
सदर पत्रात रेविंगटनने शिवाजी महाराजांचा उल्लेख "To Sevagy, General of the Hendoo Forces" असा केला आहे.
इंग्रज एवढ्यावरच थांबले नाही त्याच दिवशी त्यांनी रुस्तुम-इ-जमान ला पत्र लिहिले, आम्ही फाजीलखानाची जहाजे शिवाजीच्या लोकांकरिता आम्ही काबीज केली नाहीत म्हणून आमच्या एका इंग्रजाला कैदेत ठेवण्यात आले आहे.तसेच तुमच्या एका माणसाला शिवाजीकडे पाठवावे अशा आशयाचे ते पत्र आहे.१३ फेब्रुवारी १६६० ला हेन्री रेविंगटनने फाजीलखानाला सुद्धा अशाच आशयाचे एक पत्र लिहिले.राजापूरकर इंग्रजांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.विजापूरचा अली आदिलशहा हा वयाने लहान असल्याने सर्व कारभार बडी बेगमसाहिबा पाहत असे.तिने मक्केला जाण्याचा मानस दरबारात बोलून दाखविला होता.ती जेव्हा जहाजात बसून मक्केला जायला निघेल तेव्हा ते जहाजच ताब्यात घ्यायचे आणि बड्या बेगमेला कैद करायचे व गिफोर्डच्या सुटकेसाठी विजापुरी सरदारांवर दडपण आणायचे! पण त्यांचा हा मनसुबा प्रत्यक्षात उतरला नाही.
फिलिप गिफोर्ड जेव्हा खारेपाटणच्या किल्ल्यात कैदेत होता, तेव्हा त्याच्या अन्नपाण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली नाही.राजापूरकर इंग्रज त्याला मद्य व मांस पुरवीत होते.राजापूर व खारेपाटण यांमधील अंतर पाहता हे शक्य आहे.इंग्रज आपल्या एका अधिकाऱ्याची सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते.गिफोर्ड हा एक महिना कैदेत होता.मराठ्यांनी त्याला खारेपाटणहुन काढून सातवळी किंवा खेळणा(विशाळगड) किल्ल्यावर नेण्याचे योजले.मराठ्यांचा हा बेत गिफोर्डने इंग्रजांना कळविला.त्यावेळी गिफोर्डच्या सुटकेसाठी हेन्री रेविंगटनने योजना आखली.मराठे गिफोर्डला कोणत्या वाटेने घेऊन जाणार हे रेविंगटनला माहित होते.
इंग्रजांनी सुमारे १० मैलांवर त्यांची वाट रोखली.खारेपाटणच्या किल्ल्यातून पंचवीसजणांनी गिफोर्डला बाहेर काढले आणि ते त्याला घेऊन जाऊ लागले.त्यांची इंग्रजांशी एका गावात गाठ पडली पण तिथे कोणती चकमक झाली की नाही?हे काही समजत नाही.पण इंग्रजांनी त्याची सुटका केली.वरील उल्लेख हे राजापूरकर इंग्रजांनी सुरतेच्या इंग्रजांना २३ फेब्रुवारी १६६० रोजी लिहिलेल्या पत्रात आलेले आहेत.
इंग्रज लोक हे कधीच कोणाचे सगे नव्हते.ते कितीही स्वार्थी असले तरी स्वतः च्या लोकांची खूप काळजी करत असे हे स्पष्ट आहे.
शिवाजी व इंग्रज यांच्यातील संबंध हे सुरुवातीपासून इतके चांगले नव्हते याला हेन्री रेविंगटनच्या उचापती कारणीभूत होत्या. मराठ्यांनी जहाजे व मालाच्या बदल्यात गिफोर्डला कैदेत टाकल्यामुळे इंग्रज चांगलेच अडचणीत आले होते.
हिंदू सेनाधिपती शिवाजी असा महाराजांचा उल्लेख रेविंगटनने केला आहे, त्या पत्राचे छायाचित्र खाली देत आहे.
संदर्भ:-
1.English Records On Shivaji Vol 1
2.श्री राजा शिवछत्रपती खंड १:-ग.भा.मेहेंदळे
3.साद शिवकालीन दुर्गांची
©तुषार माने

Comments