**निग्रो बाजीराव**


मराठे व पोर्तुगीज यांच्यात १७३० सालानंतर बरेच आमनेसामने झाले. पोर्तुगीजांस पेशव्यांशी युद्ध नको होते. कारण पोर्तुगीजांना मराठ्यांची दहशत वाटत असल्याचे उल्लेख आहेत. पोर्तुगीज व मराठे यांचे चौलच्या मशिदीजवळ २ जानेवारी १७३५ ला झुंज होण्यापूर्वी काही दिवस, बाजीरावांनी सन १७३२ च्या तहास अनुसरून कल्याण व भिवंडी येथील व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यास वसईच्या 'जराल' कडे जागा मागितली होती. परंतु त्याने ति जागा तर दिली नाहीच, उलट खुद्द बाजीरावांस अनुलक्षून 'निग्रो' (Negro) असा अपमानास्पद शब्द वापरला !

ह्या काळी पोर्तुगीज लोक हिंदूस सामान्यतः 'जेंतीव' (अशिक्षित) किंवा 'नेग्रु' (काळा) अशा शब्दाने संबोधीत. वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात लिहितात, 'फिरगियांनी लबाडी केली. पत्र पाठविले त्याचे उतर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान दोन अडीच हजार माणूस व दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीस जाते.'
पुढे १७३९ सालात मराठ्यांनी वसई प्रांतातला पोर्तुगीज अंमल पूर्णपणे उठवला.

संदर्भ:- पोर्तुगीज-मराठे संबंध:- डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर
            पेशवे दफ्तर खंड १६, ले. १४

#ऐतिहासिक_माहिती



Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**