मआसिर-ए-आलमगिरी, औरंगजेब, मंदिरे व इतर काही कृत्ये


औरंगजेब

आपल्याकडे औरंगजेब बादशाहा कसा सहिष्णू होता हे दाखविण्याचाचं प्रयत्न होत असतात. पण त्याच्या चरित्राचा ससंदर्भ अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आता आपण मआसिर-ए-आलमगिरी(औरंगजेबाचे अधिकृत चरित्र) या ग्रंथात साकी मुस्तैदखानाने(हा औरंगजेबाच्या सेवेत होता) केलेल्या नोंदी पाहणार आहोत. ह्या नोंदी पाहून वाचकांनी काय ते ठरवावे, औरंगजेब धर्मनिरपेक्ष की अजून काही !

औरंगजेबाच्या आज्ञेने मंदिरं पाडली गेली त्याच्या नोंदी पुढीलप्रमाणे:-

1.     व चूं  हमगी हिम्मते हक़ तवियत ए  खिदेव ए दीनपरवर ए  शरीअतगुस्तर   
मसरुफ ए तर्वीज़ ए  शराई  ए इस्लाम व तख़रीब ए  मरासिम ए काफ़र व ‌झिलाम अस्त
ब-दिवानियान ए इजाम हुक्म ए क़ज़ाइमज़ा शरफ़ सुदूर याफ़्त अज़ घुर्रत ए माह मजकूर
मुताबिक़ ए फ़रमान ए वाजिब  अलाजआन  ए "हत्ता युतु अल-जिज़याता अन यादिन व हम -   
साघिरूना" व मुवाफ़िक़ ए रिवायत ए शरिया अज़ ज़िम्मियान ए  हुजूर व सुबाजात जिज़िया
बगिरन्द (2nd April 1679) (मूळ फार्सी पाठ पृ. १७४)
अर्थ:- आपल्या धर्माचा (म्हणजेच इस्लामचा) कडवा सरंक्षक आणि इस्लामी शरिया कायद्याचा प्रसारक अशा या बादशहाचा (म्हणजेच औरंगजेबाचा) संपूर्ण मनसुबा आणि ताकद
इस्लामी कायद्याची अंमलबजावणी आणि काफरांच्या (म्हणजे हिंदू आणि इत्तर गैर इस्लामी लोकांच्या) रिवाजांचा नाश करण्यासाठी कार्यान्वित असल्यामुळे, राज्यातील दिवाणी अधिकाऱ्यांना हुकूम देण्यात आला की कुराणातील आयतेत सांगितल्यानुसार आणि इस्लामी कायद्याच्या रिवाजानुसार राज्यातील झिम्मी लोकांकडून जिझिया घेण्यात यावा.

2.     The Lord Cherisher of the faith learned that in the provinces of Tatta, Multan and especially at Banares, the Brahman misbelievers used to teach their false books in their established schools, and that admirers and students both Hindu and Muslim, used to come from great distances to these misguided men in order to acquire this vile learning. His Majesty eager to establish Islam issued an order to the governers of all the provinces to demolish the schools and temples of the infidels and with the utmost urgency put down the teaching and the public practice of the religion of these misbelievers- 8th April 1669 (Massir-I-Alamgiri, Page No. 51-51)
अर्थ:- इस्लामचा धर्मप्रचार करण्यास उत्सुक असलेल्या बादशहांना(औरंगजेब) विदित झाले की तट्टा व मुलतान या प्रदेशात आणि विशेषकरून बनारस इथले ब्राह्मण लोक तेथे स्थापन केलेल्या त्यांच्या पाठशाळांमधून जिज्ञासूंना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या खोट्या ज्ञानाच्या पुस्तकांमधून शिकवत आहेत. हिंदू व मुस्लिम विद्यार्थी हे चुकीचे  शिक्षण प्राप्त करण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशातून ह्या दिशाभूल करणाऱ्यांकडे येतात. इस्लाम धर्माची दृढ स्थापना करण्यासाठी बांधील असणाऱ्या बादशहांनी सर्व सुभ्यांच्या सुभेदारंस आज्ञा केली की सर्व प्रांतातील हिंदूंच्या पाठशाळा आणि मंदिरे जमीनदोस्त करावीत. अत्यंत निकडीने त्यांचे शिक्षण व सार्वजिनकरित्या त्यांचा धर्म पाळण्यास मनाई करावी.

3.     Salih Bahadur, macebearer was sent to demolish the temple of Malarna. (May 1669) (IBID, Page No. 53)
अर्थ:- सालीह बहादूर नावाच्या अधिकाऱ्यास मालर्ना येथील मंदिर जमीनदोस्त करण्यास पाठविले.

4.     It was reported that according to the Emperor’s command, his officers had demolished the temple of Vishwanath at Kashi- Sept 1669 (IBID, Page No. 55)
अर्थ:- नोंदवले गेले की, बादशाही(औरंगजेब) आज्ञेनुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी काशी येथील विश्वनाथाचे मंदिर पाडले.

5.     Issued order for the demolition of the temple situated in Mathura, famous as the Dehra of Kesho Rai. In a short time by the great exertion of his officers, the destruction of this strong foundation of infidelity was accomplished, and on its site a lofty mosque was built at the expenditure of a large sum. The name of Mathura was changed to Islamabad- Jan 1670 (IBID, Page No. 60)
अर्थ:- मथुरा येथील प्रसिद्ध केशवराय मंदिर पाडण्याचे आदेश देण्यात आले. अगदी थोड्या काळात अधिकाऱ्यांनी अप्रामाणिक(लोकांच्या) अशा या मंदिराचा भक्कम पाया तोडला,  मोठी रक्कम खर्च करून त्या जागेवर एक उंच मशिद बांधण्यात आली. मथुरेचे नाव बदलून इस्लामाबाद ठेवण्यात आले होते.

6.     Darab Khan was sent with a strong force to chastise the Rajputs of Khandela and demolish the great temple of the place. Attacked the place on the 8th March, and slew three hundred and odd men who had made a bold defense. The temples of Khandela and Sanula and all other temples in the neighbourhood were demolished- Oct 1678- March 1679 (IBID, Page No. 106-107)
अर्थ:- खंडेला येथील राजपुतांना शिक्षा करण्यासाठी व तेथील मोठे मंदिर पाडण्यासाठी दरबार खानास मोठ्या फौजेनिशी पाठविण्यात आले. त्या ठिकाणी ८ मार्च रोजी हल्ला करण्यात येऊन, प्रतिकार करणाऱ्या ३०० एक लोकांना ठार करण्यात आले. खंडेला, सनुला व जवळपासची सर्व मंदिरे पाडण्यात आली.

7.     On Sunday 25th May Khan Jahan Bahadur came from Jodhpur, after demolishing the temples- 25th May 1679 (IBID, Page No. 108)
अर्थ:- मंदिरे जमीनदोस्त करून, खान जहान बहादूर रविवारी २५ मे रोजी माघारी आला.

8.     १६७९ साली औरंगजेबाने उदयपूरवर स्वारी केली होती. त्यासंबंधाने पुढील नोंद, Ruhullah Khan and Ekkataz Khan went to demolish the great temple in front of Rana’s palace- Jan 1680 (IBID, Page No. 114-15)
अर्थ:- राहुल्ला खान आणि इक्कताज खान उदेपूरच्या राणाच्या महालासमोरील मंदिर जमीनदोस्त करण्यासाठी गेले.

9.     On Saturday, 24th January 1680 the Emperor went to view lake Udaisagar, constructed by the Rana, and ordered all three temples on its bank to be demolished. (IBID, Page No. 116)
अर्थ:- उदेपूरच्या राण्याने बांधलेला उदयसागर सरोवर पाहण्यास बादशहा(औरंगजेब) शनिवार २४ जानेवारी १६८० रोजी गेले आणि त्या सरोवराच्या काठावरील तीन मंदिरे उद्ध्वस्त करण्याची आज्ञा दिली.

10.  On 29th January Hasan Ali khan brought to the Emperor twenty camel-loads of tents and other things captured from Rana’s palace and reported that one hundred and seventy-two other temples in the environs of the Udaipur ad been destroyed-29th Jan 1680 (IBIS, Page No. 116-17)
अर्थ:- २९ जानेवारी रोजी हसन अली खानाने उंटांचे वीस तंबू आणि राण्याच्या महालातून जप्त केलेल्या काही गोष्टी बादशहांकडे आणल्या. उदेपूरच्या आसपास असलेली १७२ मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली.

11.  On Monday 22nd February (1680) the Emperor went to view Chitor; by his order sixty-three temples of the place were destroyed. (IBID, Page No. 117)
अर्थ:- सोमवार २२ जानेवारी बादशहा(औरंगजेब) चित्तोड शहर पाहण्यास गेले; त्यावेळी त्यांच्या आज्ञेने तेथील ६३ मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली.

12.  Abu Turab, who had been sent to demolish the temples of Amber, returned to court on Tuesday 10th August (1680), and reported that he had pulled down sixty-six temples. (IBID, Page No. 120)
अर्थ:- अबू तुरब यास अंबेर येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यास पाठविले होते, तो मंगळवार १० ऑगस्ट रोजी दरबारात हजर झाला आणि ६६ मंदिरे जमीनदोस्त केली असे सांगितले.

13.  Hamiduddin Khan Bahadur who had gone to demolish a temple and build a mosque (in its place) in Bijapur, having excellently carried out his orders, came to court and gained praise and the post of darogha of ghusalkhana-May 1680 (IBID, Page No. 241)
अर्थ:- हमीदुद्दीन खान बहाद्दर हा विजापूर येथे मंदिर जमीनदोस्त करावयास गेला व त्याने तिथे एक मशिद बांधली, आज्ञेप्रमाणे त्याने उत्तम काम बजावले. दरबारात हजर झाल्यावर त्याची खूप प्रशंसा झाली आणि त्याला घुसलखान्याचे दरोगा नेमण्यात आले.

इतर काही नोंदी:-

14.  इ.स. १६६९ मध्ये तिलपतचा जमीनदार गोकला ह्याच्या नेतृत्वाखाली जाट शेतकऱ्यांनी बंड पुकारले, त्यावेळी ते बंड मोडून काढण्याकरिता अब्दुन नबी याने आपला मोर्चा ह्या बंडखोरांकडे वळविला. त्या चकमकीत गोकलामुळे अब्दुन नबी खान मारला गेला व त्यांनी सदाबाद परगणा लुटला. हसन अली खान आणि त्याचा पेशकर शेख राझीउद्दीन ह्यांनी मोठ्या प्रयत्नांनी गोकला जाटास पकडले. खानाने गोकला व त्याचा साथीदार सोनकी ह्या कैद्यांना बादशहाकडे पाठवून दिले. बादशाही आज्ञेनुसार कोतवाली कार्यालयात गोकलाच्या शरीराचे क्रमाक्रमाने तुकडे करण्यात आले. गोकलाच्या मुलाला व मुलीला मुस्लिम धर्माची दीक्षा देण्यात येऊन त्यांचा ताबा जवाहीर खानास देण्यात आला- Jan 1670 (IBID, Page No. 58)

15.  It was formerly the practice of the Emperors to apply the tika with their own hands to the forehead on the great Rajas, and in this reign, Asad Khan had by command put the tika on the forehead of Raja Ram Singh. The practice now was forbidden, salutation alone being declared to be enough- May 1679 (IBID, Page No. 109)
अर्थ:- पूर्वी बादशहांनी स्वतःच्या हाताने महान राजांच्या कपाळावर टिळा लावण्याची पद्धत होती. आता ह्या (औरंगजेबाच्या) कारकीर्दीत असद खानाच्या सांगण्यावरून राजा राम सिंगाच्या कपाळावर टिळा लावण्यात आला. आता ही प्रथा निषिद्ध आहे, अभिवादन केले तरी पुरेसे आहे असे घोषित करण्यात आले.

16.  At  midnight Khwaja Abdur Rahim Khan conducted to the Emperor the two sons of Vindhachal, who was brother of Ram Rai munshi of Fazal Khan. They accepted Islam and were named  Sadatullah and Sadullah- April 1686 (IBID, Page No. 168)
अर्थ:- फझल खानाचा मुन्शी राम राय याचा भाऊ विंधचल याची दोन मुलं अब्दुर रहिम खान याने मध्यरात्री बादशहांसमोर हजर केली. त्या मुलांनी इस्लामचा स्वीकार केला, त्यांची नावे सादतुल्ला व सादुल्ला ठेवण्यात आली.  

17.  Hedait-Kesh Bholanath, a convert to Islam, son of Chhattar Mal, become the head news reporter after his father’s entry into hell- May 1689 (IBID, Page No. 241)
अर्थ:- छत्तरमलचा मुलगा हिदाइत केश भोलानाथ याचे धर्मांतर(इस्लाम) करण्यात आले. त्याच्या वडिलांची नरकात रवानगी झाल्यावर तो(भोलानाथ) मुख्य बातमीदार झाला.

18.  Order were issued at Court and in the provinces that no Hindu except Rajputs should bears arms, or ride elephants, palkies, or Arab and Iraqi horses- Feb 1695 (IBID, Page No. 224)
अर्थ:- मुघल दरबारात आणि पातशाही सुभ्यात आज्ञा देण्यात आली की, राजपूत सोडून इतर हिंदूंनी कोणतेही शस्त्र बाळगू नये. हत्ती, पालखी, अरबी किंवा इराकी घोड्यांची सवारी करू नये.

19.  Shamshir Beg, grandson of Agar Khan was married to the daughter of Raja Ram- Dec 1703 (IBID, Page No. 286)
अर्थ:- अगर खानाचा मोठा मुलगा शमशेर बेगाचे लग्न राजाराम(महाराजांच्या) मुलीशी लावण्यात आले.

20.  Muhammad Muhiuddin, son of Sikandar Khan Bijapuri, was married to the daughter of Sambha- 1704 (IBID, Page No. 287)
अर्थ:- सिकंदर खान विजापुरी याचा मुलगा मुहम्मद मुहीयुद्दिन याचे लग्न संभाजी(महाराजांच्या) मुलीशी लावण्यात आले.

संदर्भ:- मआसिर-ए-आलमगिरी- साकी मुस्तैदखान:- Translated and Edited by Sir Jadunath Sarkar

Photos:-
औरंगजेबाने जिझिया लागू केल्याचा फार्सी पाठ

उदेपूरच्या राण्याच्या इथली मंदिरं पाडण्याची आज्ञा 


हिंदू चौकीलेखकांना बडतर्फ करून मुसलमानांना नेमण्याची आज्ञा 

- तुषार माने

Comments

Anonymous said…
👌👌👌
Anonymous said…
हे इतकं धार्मिक अतिक्रमण, अत्याचार होत असतानाच हिंदु सरदार औरंगजेबाकडे नोकरीत का असतील.

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**