म्हाळोजी घोरपडे आणि हिंदू धर्म !

घोरपडे घराण्याच्या इतिहासात म्हाळोजी हे एक शूर पुरुष होते. शौर्य, युद्धकौशल्य यात निपुण होते. तसेच ते निष्ठावान देखील होते. म्हाळोजी घोरपडे यांच्या कर्तबगारीसंबंधी बखरी व कैफियती यात अनेक गौरवपर उल्लेख सापडतात. घोरपडे व भोसले यांचे निकटचे संबंध होते. इतर मराठे सरदारांप्रमाणे म्हाळोजी देखील आदिलशाहीत नोकरी करीत होते. पण त्या दरबारात पक्षपाती वागणूक दिली जात. विशेषतः हिंदू धर्माच्या बाबतीत विजापूरचे बादशहा जुलमी वर्तन करतात याचा म्हाळोजींना प्रत्यक्ष अनुभव येत होता. आदिलशाहीत म्हाळोजी शहाजी राजेंबरोबर काम करत होते. पुढे त्यांनी शिवाजी महाराज व संभाजी राजांच्या कारकिर्दीत चांगली लष्करी कामगिरी केली. हिंदुराव(बहिर्जी) घोरपडे घराण्याच्या कैफियतीत म्हाळोजींसंबंधी दिलेल्या माहितीचा आशय पुढीलप्रमाणे:- 'म्हाळोजीराव घोरपडे आदिलशाही बादशहाच्या नोकरीत होते. त्यावेळी बादशहाने असा विचार केला की आपण या सलतनतीचे सर्वश्रेष्ठ सत्ताधीश असताना आपले मराठे सरदार हिंदू धर्माच्या पद्धती प्रमाणे आचरण करतात, ही गोष्ट अयोग्य आहे. आपला धर्म आणि हिंदू धर्म हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हा सर्व प्रदेश आपल्या ताब...