रोपट्याचे वटवृक्ष !!
भारताच्या आणि विशेषतः दक्खन देशाच्या इतिहासात सतरावे शतक हे फार महत्त्वाचे आहे. चैतन्यहीन बनलेल्या आणि संपूर्णपणे परकीयांच्या हुकुमतीखाली नांदणाऱ्या या खंडप्राय देशाला स्वत्वाची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे मराठ्यांनी केले. "याच मराठी सत्तेने मुघल साम्राज्य खिळखिळे करून दिल्लीच्या तख्ताचे नियंत्रण आपल्याकडे घेतले." याचे कारण शिवाजी महाराजांनी आरंभिलेला स्वराज्याचा उद्योग हे होय. शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता, तर या देशाचे काय झाले असते, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. पण भारतीय इतिहासाचा पुढील क्रम पाहता असे वाटते की भारत स्वत्वाला पारखा झाला असता. स्वराज्य ही काय चीज आहे याची त्याला कल्पनाही आली नसती. स्वराज्याचा उद्योग हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. स्वराज्याचे कार्य हे आपले कार्य आहे, या भावनेने प्रेरित होऊन जेव्हा माणसे या कामाला वाहून घेतात, तेव्हाच स्वराज्याचे स्वप्न साकार होते. शिवाजी महाराजांनी अगदी लहानपानापासून हा उद्योग सुरु ठेवला. १६४५ साली म्हणजे वयाच्या केवळ १५ व्या वर्षी रोहिडखोऱ्याच्या देशमुखाला धीर देउन आपल्या उद्योगात सामील...