आळंदी ज्ञानदेव माऊलीच्या समाधीस इनाम चालविणे बाबत
शु. १५९३ कार्तिक शु.३
सु. १०७२ रजब १
इ. १६७१ ऑक्टोबर २५
नकल
श्री
ज्ञानदेव
अज
रक्तखाने राजश्री सिवाजी राजे साहेब दाम दौलत हू हाजर बज्यानेब कारकून हाल व
इस्तकवाल व देशमुखानी व देशपांडे यानी व मोकदमानी व रयानी प्रांत चाकण सु| इसने सबैन
अलफ. श्री याचे इनाम मौजे आलंदी प्रगणे मारी सालाबाद जि|| जमीन मुजेरी सेत १८ = ||
येक खंडी अडीच मण देवाचे देवास दिधले असे. कुलबाब कुलकानू दुमाले केले असे. दुमाला
करणे. यासी काडीची तोसीस न लावणे. थलकरी अगर हरकोणी इस्कील न करणे. सदरहू थलबद
देणे. देवाचे देवास चालवणे. साल दर साल चालवीत जाणे. ताजा खुर्दखताचा उजूर न करणे.
हिंदु होऊन इस्कील करील त्यास गाईची आण असे. मुसलमान होऊन इस्कील करील त्यास
सोराची आण असे.लिहिले प्रो| चालवणे. तालीक घेऊन असल फिराऊन राजश्री रामानंद गोसावी
तपस्वी यापासी देणे पा| हुजूर.
तेरीख छ
१ रजब सुरु सुद
शब्दांचे अर्थ:-
अजरक्तखाने:- कचेरीपासून
दामदौलत हुं:- त्याचे राज्य चिरायू होवो
बजान्येब:- कडे
हाल:- हल्लीचे
इस्तकबाल:- पुढे होणारे (भावी म्हणता येईल)
कुलबाब:- सर्व बाबी
कुलकानू:- सर्व नियमांप्रमाणे
दुमाला: स्वाधीन
थलकरी:- ज्याला गावात स्वतःच्या मालकीची जमीन व
घर आहे असा
खुर्दखत:- भोगवटा असणे बद्दल सनद
उजूर:- बेपर्वाई, हरकत
इस्कील:- अडथळा, हरकत
सोर:- डुक्कर
संदर्भ:-
मूळ संदर्भ:- पेशवे दफ्तर ३१
दुय्यम संदर्भ:- छत्रपती शिवाजी महाराजांची
पत्रे – पत्र क्रं १२३
Comments