Posts

**अकबर व इतर धर्म**

Image
इस्लामच्या पायाभूत तत्वांबाबत त्यांच्या धर्म पंडितांमध्ये असलेले मतभेद व त्यांच्या आपसातील असलेल्या भांडणांमुळे अकबर वैतागला आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्याने इतर धर्मांच्या विद्वानांना इ.स.१५७८ च्या शेवटला इबादतखान्यात चर्चेला पाचारण केले.अबुल फझल म्हणतो,"The Imperial Court became the home of piligrims of the seven worlds and the scholars of various religious sects." १) अकबर व झोरोस्ट्रीयन्स:-  झोरोस्ट्रीयन उर्फ पारशी धर्माचा विद्वान धर्मगुरू नवसारीचा दस्तूर मेहरजी राणा याच्याशी अकबराची इ.स.१५७३ मध्ये प्रथम भेट झाली होती. इ.स.१५७८ अकबराने दस्तूर राणाला इबादतखान्यात पाचारण केले.त्याच्या संपर्कामुळे अकबरावर पारशी धर्माचा बराच प्रभाव पडला व अकबराने पारशी धर्माच्या काही तत्वांचा स्वीकारही केला.त्याने दस्तूर राणाला २०० बिघे जमीन इनाम म्हणून दिली.पारशी धर्माच्या प्रभावामुळे अकबराने त्याच्या महालात अखंड अग्निप्रज्वलन प्रथा सुरु केली,अशा रीतीने अकबराने सूर्य,अग्नि,प्रकाश या देवतांविषयी पूज्यभाव बाळगला. २) अकबर आणि जैनधर्म:- अकबराचा जैन धर्माशी संपर्क इ.स.१५५८ मध्येच आला.इ...

**प्रेमाचा मामला औरंगजेब गुंगला**

Image
आलमगीर औरंगजेब म्हणजे क्रुरता,कपट,धर्मांधता,अत्याचार,आबिद(परमेश्वराचा भक्त) ह्या सगळ्यांचा पुतळाच होय.औरंगजेब हा त्याची आई मुमताजमहल हिचे सहावे अपत्य होय.त्याचा जन्म २४ ऑक्टोबर १६१८ रोजी झाला.तो लहानपणापासून अत्यंत साहसी,बुद्धिमान,महत्वकांक्षी असल्याने १६३४ मध्येच दहा हजाराचा मनसबदार झाला.दक्खनच्या सुभ्याचा सुभेदार म्हणून त्याने दोन वेळा काम पाहिले.शाहजहान बादशहाने त्याला जेव्हा इ.स.१६५२ मध्ये दक्खनच्या सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमले  तेव्हापासूनच औरंगजेबाने दिल्लीचे शाहीतख्त कसे मिळवता येईल यासाठी आपली बहीण रोशनआराच्या मदतीने प्रयत्न सुरु केले.इ.स. १६५२ मध्ये औरंगजेब दिल्लीहून औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाला तेव्हा वाटेत त्याने बुऱ्हाणपूरला मुक्काम केला.हा मुक्काम बहुधा त्याच्या आयुष्यातला यादगार मुक्काम असावा. येथेच औरंगजेबाच्या आयुष्याची दुसरी बाजू समोर येते.त्याने त्याच्या आयुष्यात घालवलेले गुलाबी दिवस असे त्यास म्हणता येईल.गुलाबी दिवस म्हणजे धर्मनिष्ठ औरंगजेबाचे प्रेमप्रकरण! ह्या प्रेमप्रकरणा आधी औरंगजेबाची तीन लग्ने झालेली होती.पण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असत........

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

Image
३ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वरास संभाजी राजांना कैद करण्यात आले.त्यानंतर राजारामाला मराठ्यांचा राजा म्हणून जाहीर करण्यात आले. येसूबाईनी या गोष्टीस संमती दिली. येसूबाईंना राजारामाविषयी आस्था होती, तसेच राजारामास शाहूबद्दल प्रेम होते. संभाजीराजे पकडले जाण्यापूर्वी रायगडाभोवती मोगली सैन्य जमा झाले होते. औरंगजेबाने एतिकादखान(झुल्फिकारखान) याला रायगडाच्या वेढ्याच्या कामास पाठविले होते. २५ मार्च १६८९ रोजी त्याने रायगडास वेढा घातला. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांचे समर्पण झाले. पतीनिधनाचे दुखः कोसळले असताना येसूबाईंनी जी धीरोदात्तता दाखविली, त्यास मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. मुघलांचा वेढा कडक होत असताना सर्व परिवार हाती लागू नये म्हणून,येसूबाईंनी सल्ला दिला.  'मुलाचे(शाहू) वय लहान,राज्य तरी गेलेचं,त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार शूर याणी एक विचारे होऊन, राजारामसाहेब यास घेऊन बाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बांकी ऐशी दुसरी नाहीच. अर्थी मुलास व आम्हांस येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे. तुम्ही सर्वांनी राजारामसाहेबांसहवर्तमान बाहेर पडून, फौजा ज...

बलकुबल औरंगजेब

Image
दक्षिणेत मराठ्यांच्या मुळावर आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी त्राहीभगवान करून सोडले होते.मराठ्यांनी इतकी लांडगेतोड केली होती की,मुघल अक्षरशः हताश झाले होते.मराठ्यांचे राजकुटुंब हाती सापडूनसुद्धा ताराबाईसारख्या रणरागिणीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सळसळत्या समशेरींनी त्याची झोप उडवली.औरंगजेबास जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. १७०५-६ च्या सुमारास औरंगजेब पूर्ण हताश झाला होता.त्याला मराठी सैन्य किड्यामुंग्याप्रमाणे सर्व बाजूनी कुरतडत असल्याची जाणीव झाली होती.औरंगजेबाची घमेंड उतरवणारे हे पुढील पत्र आहे,त्यात त्याचा निश्चय किती डळमळला होता हे दिसते.सदर पत्र हे १७०५-६ च्या सुमारास बादशहाच्या आज्ञेने फिरोजजंगाला(निजाम-उल-मुल्क याचा बाप) लिहिले आहे. "बादशहाच्या आज्ञेप्रमाणे मी (इनायततुल्लाखान) कळवीत आहे की, दख्खनच्या सुभेदाराकडून नरकवासी शिवाजी व त्याचा मुलगा यांचे व इतर बंडखोरांचे पारिपत्य झाले नाही.पंचवीस वर्षापूर्वी आम्ही सैन्यासह अजमीरहून निघालो आणि दक्षिणेत तळ दिला.परमेश्वराच्या मार्गानेच चालण्याची आमची नियत होती.या पंचवीस वर्षांच्या काळात परमेश...

**आलिया भोगासी(बिचारा फिलिप गिफोर्ड)**

Image
सदर चित्र हे कोणाशीही संबंधित नसून त्या काळातला इंग्रजी अधिकारी कसा असू शकतो हे दाखवण्यासाठी दिले आहे. शके १५८१ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमीस म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी राजांनी अफझलखानास यमसदनी पाठविले.त्यानंतर महाराजांनी आदिलशाहीशी युद्धाची आघाडी उघडली.ते स्वतः आपले मुख्य सैन्य बरोबर घेऊन सह्याद्रीच्या पूर्वेचा म्हणजे देशावरचा विजापुरी मुलुख काबीज करीत निघाले,त्याच समयी काही सैन्य कोकणात धुमाकूळ घालून आदिलशाही मुलुख जिंकून घेऊ लागले.मराठी सैन्य कोकणात घुसल्यावर आदिलशाही सैन्याची पुरती दाणादाण उडाली.विजापुरी अधिकारी आपापल्या जागा सोडून राजापूरकडे पळत सुटले.त्यावेळी राजापूर बंदर आदिलशाहीच्या ताब्यात होते व तिथे रुस्तुमजमा नावाचा अधिकारी तिथला कारभार पाहत असे.ह्या रुस्तुम-इ-जमानचा महाराजांनी कोल्हापूरजवळ २८ डिसेंबर १६५९ रोजी पराभव केला होता.राजापूर ही एक मोठी बाजारपेठ होती.आयात-निर्यातीचे केंद्र असल्यामुळे राजापूर श्रीमंत शहर होते. इ.स.१६५८ च्या उत्तरार्धात इंग्रजांनी तिथे एक वखार उघडलेली होती. दोरोजी(धोरोजी) नावाच्या मराठी सरदाराने कोकणात जोरदार मुसंडी मारली होती....

***महाराजांना_फसवलं***

लेखाचा मथळा बघून वाटेल असं का लिहिलंय पण समाजात जे दिसतंय त्यावरून असं लिहिलंय.त्यामुळे कृपया गैरसमज नसावा. शिवाजी महाराजांचा जन्म शालिवाहन शके १५५१,फाल्गुन मास, शिशिर ऋतू,हस्त नक्षत्र वद्य तृतीया म्हणजेच १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी झाला. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. जर शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर काय झाले असते?ह्या प्रश्नाला अनेक लोक वेगवेगळी उत्तरं देतील. पण माझा विचारण्याचा उद्देश थोडा वेगळा आहे.इतक्या मोठ्या visionary माणसाचा आपल्याकडे जन्म झाला पण त्याला आपण योग्य न्याय देऊ शकलो का? महाराजांना आपण अनेक विशेषणे लावतो.पण आपण महाराजांना लावू तितकी विशेषणं कमीच आहेत कारण त्यांचा पराक्रम कितीतरी पटीने मोठा आहे.शिवाजी महाराज हे आपल्या सगळयांचे गोत्र आहे.आपल्याकडे लोक शिवाजी महाराजांचे मोठे भक्त म्हणून मिरवत असतात.गळ्यात लॉकेट,हातात कडे तसेच टॅटू पण काढतात.ह्यावरून तुमचे महाराजांवरचे प्रेम सिद्ध होते का?महाराजांचा उदोउदो करणारे अनेक लोक आहेत.डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या महाराजांना आपण डोक्यात कधी घेणार? मुळात इतिहास हा विषय संदर्भासहित अभ्यास करण...

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**

Image
सदर चित्र बाळाजी विश्वनाथ पेशवे पुस्तकातून साभार (थोड्या दिवसांपूर्वी आलेल्या पेशवा बाजीराव ह्या कार्यक्रमात राधाबाईंचे व्यक्तिमत्व दाखवलेच आहे,पण cinematic liberty च्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चुकीच्या दाखवल्या जातात.कादंबरी,सिनेमे,कार्यक्रम ह्यातून दाखवला जाणारा इतिहास पूर्णपणे बरोबर असतो असे म्हणता येत नाही.इतिहास हा पुराव्यांवर अवलंबून असतो,त्यामुळे त्याचा अभ्यास करणे गरजेचे!) कोकणातील गणपतीपुळ्याच्या आग्नेयेला असलेले नेवरे हे राधाबाईंचे माहेरचे गाव होय.त्यांचे वडील दादाजी जोगदेव बर्वे हे सावकार होते.राधाबाईंचा जन्म कधी झाला याचे साल उपलब्ध नाही.त्यांना मल्हारपंत व त्र्यंबकपंत नावाचे दोन थोरले भाऊ होते.राधाबाईंना चांगले लिहिता वाचता येत होते ह्या गोष्टीला भरपूर आधार आहे.त्यांचे हस्ताक्षर जुन्या वळणाचे बाळबोध पद्धतीचे असावे.त्यांचा विवाह श्रीवर्धनच्या भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ भट यांच्याशी झाला.लग्नावेळी बाळाजी हे १२-१३ वर्षांचे व राधाबाई ह्या ६-७ वर्षांच्या असाव्यात असा तर्क आहे.त्यांचा विवाह नेवरे येथे झाला असावा.हे लग्न २० रु. झाले अशी ख्याती आहे.राधाबाईंना थोरले बाजीर...