Posts

राजाराम महाराजांचा कुटुंबकबिला जिंजीत [चंदी] दाखल

Image
राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास अत्यंत खडतर होता व त्यात त्यांच्या जीवासही बराच धोका होता. महाराज या प्रवासास निघाले तेव्हा त्यांनी त्यांचा कुटुंबकबिला मागे विशाळगडावर ठेवला होता. विशाळगडाहून जिंजीस जाणे आणि स्त्रियांनी प्रवास करणे, ते सुद्धा गुप्तपणे, ६०० मैलांचा प्रवास ही अतिशय कठीण गोष्ट होती.१ रामचंद्रपंतांनाही राण्यांना महाराजांकडे कसे पोहचवायचे असा प्रश्न पडला होता. तो सोडविण्यासाठी विशाळगडाहून काही विश्वासू माणसे त्यांनी जिंजीकडे पाठविली आणि राण्यांच्या प्रवासाची एक योजना महाराजांना कळविली.२ त्यांना सुखरूपपणे जिंजीकडे आणण्याची जबाबदारी राजाराम महाराजांनी लिंगो शंकर तुंगारे व विसाजी शंकर तुंगारे ह्या सावकारी पेशाच्या गृहस्थांवर सोपविली. हे दोघे बंधू म्हणजे खंडो बल्ल्लाळ चिटणीस यांचे मामा असून, त्यांची तारवे किनारपट्टीवर व्यापारी मालाची ने-आण करत असत.३ खंडो बाल्लाळांचे दोघेही मामा राजापूर येथे राहून सावकारी करीत होते. दोघेहीजण विश्वासू आहेत असे पाहून रामचंद्रपंतांनी ठरवले की महाराणी ताराबाई, राजसबाई वगैरे राजघराण्यातील लोकांनी त्यांच्या मदतीने प्रथम समुद्रामार्गे होन...

आळंदी ज्ञानदेव माऊलीच्या समाधीस इनाम चालविणे बाबत

                                              शु. १५९३ कार्तिक शु.३                                                      सु. १०७२ रजब १                                                      इ. १६७१ ऑक्टोबर २५                                                                   नकल                                   श्री    ...

समस्त जातीनी धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे चालावे

Image
शिवाजी महाराज हे वर्णाश्रमधर्माचे पुरस्कर्ते होते.शिवपूर्वकाळापासून झालेला यवनांचा सुळसुळाट, त्यांचे राज्य व सेवा तसेच संपर्कामुळे वर्णाश्रमव्यवस्थेतील प्रत्येक जातीचे आचार धार्मिक दृष्ट्या दूषित झाले होते.म्हणून त्यांनी सर्व जातींना उद्देशून वरील आज्ञापत्र जाहीर केले.ज्ञातीविवेक व स्कंद पुराणांतर्गत सह्याद्रीखंड व इतर मान्यताप्राप्त स्मृतीग्रंथात प्रत्येक जातीचे आचारनियम दिले आहेत त्यानुसार त्या जातीने वागावे म्हणजे समाजातील आचारसंकट दूर होईल, असे महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे.                --------------------------------------------                                            श.१५९८, माघ. शु. ५                                            सु. १०७७, जिल्हेज ४                 ...

**बॉर्न फायटर लोकमान्य टिळक**

Image
आधुनिक भारताचे जनक                           दोन दशकांहून अधिक काळ राजकीय क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनावर लोकमान्य टिळकांनी अधिराज्य गाजवले.Among the political leaders who dominated the thoughts and activities of their countrymen during this period the foremost place must be given to Mr.Tilak. ज्या काळात भारतीय सुशिक्षित लोक ब्रिटिशांच्या राजवटीचे गोडवे गात होते, जनता सुस्त आणि आपल्या अधोगतीबद्दल उदासीन बनली होती, आणि भारताला अंधकाराने घेरले होते, तेव्हा क्षितिजावर टिळकांचा उदय झाला आणि आत्मसन्मानाचे स्फुलिंग लोकांच्या मनात चेतवून स्वतःच्या अधिकारांसाठी उभे राहण्याचे धैर्य टिळकांनी त्यांना दिले. भारतातील ब्रिटिशांची सत्ता हे ईश्वरी वरदान आहे तसेच ब्रिटिशांची न्यायबुद्धी भारताची राजकीय प्रगती घडवून आणील असे काही विद्वान लोकांना वाटत असल्याने ते कधीही जनतेकडे गेले नाहीत.आपल्या शक्तीचा खरा उगम लोकांच्या ठायी आहे हे वास्तव त्यांनी कधीच ध्यानात घेतले नाही.लोक घाम गाळत राहिले आणि कुठलीही आशा न धरता सोसत राहिले.तेव्हा परक...

**हिंदुस्थान अमर आहे नि अमर राहील**

Image
स्वदेशावरील वा मानवजातीवरील प्रेम अंतःप्रेरित असेल तर ते उदात्त ठरते नि चिरकाल टिकते. परंतु केवळ बाह्य प्रेरणेतून निर्माण झालेली देशभक्ती नि मानवसेवेची वृत्ती लवकरच कोमेजते आणि लोप पावते.अंतःप्रेरित भक्ती मानवजातीच्या प्रगतीवरील किंवा मानवी जीवनाच्या पावित्र्यावरील श्रद्धेतून उदय पावलेली असते.पण जे कोणत्याही विशिष्ट देशाचे नसून साऱ्या जगाचेच झालेले असतात, अशा निः स्वार्थी देशभक्तांच्या उज्वल मालिकेत सावरकरांची गणना होते. १९४१ सालात मद्रासला भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात जिनांनी हिंदुमहासभेवर कडाडून हल्ला चढविला. हिंदुमहासभेत कसलीही सुधारणा होण्याची काडीमात्र अशा उरलेली नाही असे त्यांनी मत व्यक्त केले.आणि ब्रिटिश सरकारला अशी धमकी दिली की,"तुम्ही जर पाकिस्तानी राज्यांचा गट निर्माण करण्याची आमची मागणी पुरवली नाहीत, तर दुसरे लोक पुढे होऊन आमची इच्छा पुरी करतील." जिनांनी हिंदुमहासभेविषयी काढलेल्या उद्गारांचे स्वागत करून सावरकर म्हणाले की,"आमच्या निष्कलंक  देशभक्तीचाच हा निर्भेळ गौरव आहे." काँग्रेसला इशारा देऊन सावरकर पुढे म्हणाले,"काँग्रेस पक्षानेही  पाक...

**अकबर व इतर धर्म**

Image
इस्लामच्या पायाभूत तत्वांबाबत त्यांच्या धर्म पंडितांमध्ये असलेले मतभेद व त्यांच्या आपसातील असलेल्या भांडणांमुळे अकबर वैतागला आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्याने इतर धर्मांच्या विद्वानांना इ.स.१५७८ च्या शेवटला इबादतखान्यात चर्चेला पाचारण केले.अबुल फझल म्हणतो,"The Imperial Court became the home of piligrims of the seven worlds and the scholars of various religious sects." १) अकबर व झोरोस्ट्रीयन्स:-  झोरोस्ट्रीयन उर्फ पारशी धर्माचा विद्वान धर्मगुरू नवसारीचा दस्तूर मेहरजी राणा याच्याशी अकबराची इ.स.१५७३ मध्ये प्रथम भेट झाली होती. इ.स.१५७८ अकबराने दस्तूर राणाला इबादतखान्यात पाचारण केले.त्याच्या संपर्कामुळे अकबरावर पारशी धर्माचा बराच प्रभाव पडला व अकबराने पारशी धर्माच्या काही तत्वांचा स्वीकारही केला.त्याने दस्तूर राणाला २०० बिघे जमीन इनाम म्हणून दिली.पारशी धर्माच्या प्रभावामुळे अकबराने त्याच्या महालात अखंड अग्निप्रज्वलन प्रथा सुरु केली,अशा रीतीने अकबराने सूर्य,अग्नि,प्रकाश या देवतांविषयी पूज्यभाव बाळगला. २) अकबर आणि जैनधर्म:- अकबराचा जैन धर्माशी संपर्क इ.स.१५५८ मध्येच आला.इ...

**प्रेमाचा मामला औरंगजेब गुंगला**

Image
आलमगीर औरंगजेब म्हणजे क्रुरता,कपट,धर्मांधता,अत्याचार,आबिद(परमेश्वराचा भक्त) ह्या सगळ्यांचा पुतळाच होय.औरंगजेब हा त्याची आई मुमताजमहल हिचे सहावे अपत्य होय.त्याचा जन्म २४ ऑक्टोबर १६१८ रोजी झाला.तो लहानपणापासून अत्यंत साहसी,बुद्धिमान,महत्वकांक्षी असल्याने १६३४ मध्येच दहा हजाराचा मनसबदार झाला.दक्खनच्या सुभ्याचा सुभेदार म्हणून त्याने दोन वेळा काम पाहिले.शाहजहान बादशहाने त्याला जेव्हा इ.स.१६५२ मध्ये दक्खनच्या सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमले  तेव्हापासूनच औरंगजेबाने दिल्लीचे शाहीतख्त कसे मिळवता येईल यासाठी आपली बहीण रोशनआराच्या मदतीने प्रयत्न सुरु केले.इ.स. १६५२ मध्ये औरंगजेब दिल्लीहून औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाला तेव्हा वाटेत त्याने बुऱ्हाणपूरला मुक्काम केला.हा मुक्काम बहुधा त्याच्या आयुष्यातला यादगार मुक्काम असावा. येथेच औरंगजेबाच्या आयुष्याची दुसरी बाजू समोर येते.त्याने त्याच्या आयुष्यात घालवलेले गुलाबी दिवस असे त्यास म्हणता येईल.गुलाबी दिवस म्हणजे धर्मनिष्ठ औरंगजेबाचे प्रेमप्रकरण! ह्या प्रेमप्रकरणा आधी औरंगजेबाची तीन लग्ने झालेली होती.पण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असत........